सेवानिवृत्त माजी सैनिकांना अंशदायी आरोग्य योजनेच्या वतीने ६४ केबी कार्ड

‘मिलिटरी रिसिव्हेबल ऑर्डर’ (एमआरओ) नसल्याचे पत्र इसीएचएस पॉलिक्लिनिकला सादर करावे लागणार
before April 1 2003 64 KB card health scheme to retired ex-servicemen Military Receivable Order  pune
before April 1 2003 64 KB card health scheme to retired ex-servicemen Military Receivable Order punesakal
Updated on

पुणे : लष्करातून १ एप्रिल २००३ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांना देखील आता माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेच्या (इसीएचएस) वतीने ६४ केबी कार्ड दिले जाणार आहे. यासाठी त्यांना ‘मिलिटरी रिसिव्हेबल ऑर्डर’ (एमआरओ) नसल्याचे पत्र इसीएचएस पॉलिक्लिनिकला सादर करावे लागणार आहे. सशस्त्रदलातून सेवानिवृत्त होणारे अधिकारी, सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी इसीएचएस विभाग कार्य करते. ही वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी लाभार्थ्यांना इसीएचएस कार्ड दिले जाते.

दरम्यान इसीएचएस विभागातर्फे एप्रिल २००३ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिक किंवा विधवांना ६४ केबी कार्ड घेण्यासाठी एमआरओ सादर करणे आवश्‍यक असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु बऱ्याच लाभार्थ्यांकडे एमआरओ उपलब्ध नसल्याने त्यांना हे कार्ड प्राप्त होत नव्हते. मात्र आता इसीएचएस विभागाने या समस्येची पाहणी करत इसीएचएसचा लाभ सर्वांना मिळावा या अनुषंगाने २००३ पूर्वीच्या माजी सैनिकांना ६४ केबी कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी माजी सैनिकांना एमआरओ नसल्याचे स्वयं प्रमाणित पत्र संबंधित इसीएचएस पॉलिक्लिनिक मध्ये सादर करणे आवश्‍यक आहे. हे पत्र इसीएचएसच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी लाभार्थ्यांनी echs.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

वैद्यकीय सुविधेसाठी ६४ केबी इसीएचएस कार्ड गरजेचे

देशातील विविध भागांमध्ये इसीएचएस पॉलिक्लिनिकमध्ये माजी सैनिक, त्यांचे कुटुंब आणि सैनिकांच्या विधवा यांचे उपचार होतात. यासाठी त्यांना स्मार्ट कार्ड म्‍हणजेच हे इसीएचएस कार्ड दिले जाते व कार्डमध्ये लाभार्थ्यांचा वैद्यकीय इतिहास जतन करणे सोपे होते. कार्डमधील माहिती संकलित करण्याची क्षमता वाढविण्याच्या अनुषंगाने कार्डला १३ केबी पासून ६४ केबी मध्ये परिवर्तित करण्यात आले. इसीएचएस विभागाद्वारे पूर्वीचे १३ केबी कार्डचा वापर बंद केला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना वैद्यकीय सुविधांसाठी ६४ केबी इसीएचएस कार्ड घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com