
पुणे : पालखी सोहळ्यात चोरी होऊ नये, कुठलाही अपघात होऊ नये किंवा अन्य अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिस अक्षरशः रात्रीचा दिवस एक करतात. एकीकडे संपूर्ण गर्दीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी खांद्यावर झेलतानाच, दुसरीकडे भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे, यासाठीही पोलिसांचे प्रयत्न सुरू असतात. मात्र या ताणतणाव व कामाच्या व्यापातून काही क्षणांचा वेळ काढून अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पादुकांचे दर्शन घेतले.