समर्थ इंजिनिअरिंगला पीएच.डी. केंद्र मान्यता

समर्थ इंजिनिअरिंगला 
पीएच.डी. केंद्र मान्यता
Published on: 

बेल्हे, ता. १७ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या महाविद्यालयाच्या एमबीए (व्यवस्थापन) विभागाला, नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून  पीएच.डी. संशोधन केंद्राची मान्यता प्राप्त झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्धारित निकषांनुसार आवश्यक असणाऱ्या संशोधन सुविधा, शैक्षणिक पायाभूत व्यवस्था आणि अनुभवी संशोधन मार्गदर्शकांची उपलब्धता यांची पूर्तता केल्यानंतर एमबीए विभागाला ही मान्यता मिळाली आहे. या संशोधन केंद्रासाठी विभागात तीन मान्यताप्राप्त संशोधन मार्गदर्शक कार्यरत आहेत. यामध्ये मानव संसाधन व्यवस्थापन व ऑपरेशन्स मॅनेजमेंट या विषयांसाठी डॉ. महेश भास्कर, ऑपरेशन्स मॅनेजमेंटसाठी डॉ. रुस्तुम दराडे आणि वित्तीय व्यवस्थापन या विषयासाठी डॉ. शशिकांत ताजणे यांचा समावेश आहे. विशेषतः मानव संसाधन व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन, ऑपरेशन्स मॅनेजमेंट तसेच उद्योग आणि व्यवसाय व्यवस्थापनाशी संबंधित आधुनिक संकल्पना, समस्या व आव्हाने यांचा संशोधनात्मक अभ्यास करण्यास चालना मिळणार आहे. 
या मान्यतेबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, एमबीए विभागप्रमुख डॉ. महेश भास्कर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Samarth College MBA Department Gets PhD Research Centre Approva
PARAM Supercomputer
Horizon Europe
University-level 'Avishkar' research competition from November 18