बेल्हे-जेजुरी महामार्ग पुलावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद

आंबेगाव तालुक्यात दोन दिवसापासून विशेषकरून डिंभेधरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे आणि डिंभे धरण शंभर टक्के भरले आहे.
Belhe Jejuri Highway Bridge
Belhe Jejuri Highway BridgeSakal
Summary

आंबेगाव तालुक्यात दोन दिवसापासून विशेषकरून डिंभेधरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे आणि डिंभे धरण शंभर टक्के भरले आहे.

पारगाव - आंबेगाव तालुक्यात दोन दिवसापासून विशेषकरून डिंभेधरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे आणि डिंभे धरण शंभर टक्के भरले आहे. आज दुपार पासून डिंभे धरणातून घोडनदीन २२ हजार क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे घोडनदीला मोठा पूर आला आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील नदीच्या काठावरील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारीचे मोठ्या नुकसान झाले. तसेच अनेक ठिकाणी पुराचे पाणी शेतजमिनित घुसल्याने शेतांचे व पिकांचे नुकसान झाले आहे. तर बेल्हे जेजुरी महामार्गावर लाखणगाव येथे घोडनदीवर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या महामार्गावरील वहातुक बंद करण्यात आली आहे.

पावसाचे पाणी तसेच डिंभे धरणातून घोड नदी पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याने आज दुपारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नदीच्या पात्रातील पाणी पातळी वाढत गेली. व सांयकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नदीला मोठा पुर आला. या पुराच्या पाण्यात नदीच्या काठावर असलेल्या पारगाव, काठापूर बुद्रुक, देवगाव व लाखणगाव या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत पुराचे पाणी गेले शेतजमीनीचे व पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.

बेल्हे-जेजुरी महामार्गावरील लाखणगाव येथे घोडनदीवर असलेल्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने या महामार्गावरील वहातुक बंद करण्यात आली. त्यामुळे या महामार्गावरील पर्यायी वाहतूक पारगाव शिंगवे या पुलावरून करावी. असे आवाहन पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी केली आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांनी स्वतः थांबून नागरिकांना सतर्क राहण्याबाबत सूचना करत होते. यावेळी त्यांनी सांगितले कि, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून सुमारे दहा कोटी रुपये नवीन पुलाला मंजूर केले आहे. व लवकरच पुलाचे काम चालू होणार असल्याचे सांगितले यावेळी शिरीषकुमार रोडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com