pune city trafficsakal
पुणे
Pune Traffic : लाडक्या बहिणी आणि भाऊ अडकले वाहतूक कोंडीत
पुणे शहरासह उपनगरांत आणि पुण्यातून बाहेर जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या रांगा.
पुणे - भावंडांच्या स्नेहबंधनाचा सण असलेल्या रक्षाबंधनानिमित्त शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याने पुण्यात येण्या-जाण्यासाठीच्या सर्व प्रमुख मार्गांवर आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. यासह शहरातील मध्यभागात आणि उपनगरांत देखील मोठी कोंडी झाली आहे.
