बेंबळे गटासाठी भाजप-शिवसेनेत प्रतिष्ठेची लढाई: पंचायत समितीसाठी बेंबळे गणात तिरंगी तर पिंपळनेरमध्ये पंचरंगी लढत, प्रचाराच्या रणधुमाळीने वेधले माढा तालुक्याचे लक्ष
बेंबळे जि.प. गट
बेंबळे गटासाठी भाजप-शिवसेनेत प्रतिष्ठेची लढाई
पिंपळनेर गणात पंचरंगी तर बेंबळेत तिरंगी लढत
सुहास कांबळे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपळनेर, ता. ४ : माढा तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बेंबळे जिल्हा परिषद गटात निवडणूक प्रचार जोरात सुरू असून, जिल्हा परिषदेसाठी दुरंगी, पंचायत समितीसाठी बेंबळे गणात तिरंगी तर पिंपळनेर गणात पंचरंगी लढत होत आहे. होम टू होम प्रचारासह हळदी-कुंकू कार्यक्रम, कॉर्नर सभा, घोंगडी बैठका, जाहीर सभांमधून प्रचाराची रंगत वाढली आहे. बेंबळे गणासाठी मात्र एकाच गावातील तीन उमेदवार परस्परविरोधी उभे ठाकल्याने येथील निवडणूक केवळ पक्षाची न राहता, स्थानिक प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.
अनेक वर्षांपासून माजी आमदार बबनराव शिंदे यांचा बालेकिल्ला समाजल्या जाणाऱ्या बेंबळे जिल्हा परिषद गट हा महिलांसाठी आरक्षित असल्याने येथे भाजपकडून माजी उपसभापती तुकाराम ढवळे यांच्या पत्नी रोहिणी ढवळे व शिवसेनेचे संजय कोकाटे यांच्या पत्नी सविता कोकाटे यांच्यात दुरंगी अतीतटीची लढत आहे. तर पंचायत समितीसाठी बेंबळे व पिंपळनेर या दोन्ही गणांत सर्वसाधारण आरक्षण आहे. तसेच पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण सर्वसाधारण असल्याने येथून निवडून येणारे उमेदवार सभापतीपदाचा दावेदार ठरू शकतो.
बेंबळे गणासाठी विष्णू महादेव हुंबे (भाजप), विजयसिंह मोहिते-पाटील यांचे समर्थक पोपट अनपट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार व परमेश्वर गायकवाड अपक्ष एकाच गावातील या तिघांनी परस्परविरोधी दंड थोपटले आहेत. तर पिंपळनेर गाण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बिभीषण डांगे (भाजप), संजय ढवळे (शिवसेना) शुभम फुगे (शिवसेना उबाठा) संघर्ष पांडगळे (वंचित बहुजन आघाडी) आजिनाथ जाधव (अपक्ष) हे विविध पक्षाचे उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह शिंदे, विक्रमसिंह शिंदे यांच्या गावागावातील कॉर्नरसभा, पदयात्रा बेंबळे येथील पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या जाहीर सभेमुळे भाजपच्या प्रचाराला बळ मिळाले असले, तरी विरोधी गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार अभिजित पाटील, शिवसेनेचे संजय कोकाटे यांच्या सभांमुळे राजकीय वातावरणात अधिकच रंगत आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

