जेवायला शिवभोजनची थाळी, दारूसाठी मात्र पैशांची उधळपट्टी 

manchar
manchar
Updated on

मंचर (पुणे) : तब्बल दीड महिना दारूपासून वंचित असलेल्या तळिरामांनी सोमवारी (ता. 4) मंचर (ता. आंबेगाव) येथील दारू दुकानांसमोर गर्दी केली होती. तब्बल अर्धा किलोमीटरच्या रांगेत शिवभोजन, धान्याचे मोफत किट आदी सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांचाही त्यात समावेश होता. 

मंचर ग्रामपंचायतीसमोरच देशी दारूचे दुकान आहे. सकाळपासूनच तळीराम दुकान उघडण्याची वाट पाहत होते. दुपारी सव्वादोनच्या सुमारास दारूचे दुकान सुरू झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. मोबाईलवर फोन करून ही बातमी उत्साहाने मित्र एकमेकांना सांगत होते. शुकशुकाट असलेल्या या रस्त्यावर दहा ते 15 मिनिटांत दारू खरेदीसाठी रांग लागली होती. सुरवातीलाच सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला. दारू विक्रेत्यांकडून पुरेशा प्रमाणात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली नव्हती, अशी तक्रार परिसरातील नागरिकांनी केली. 

याबाबतची माहिती समजताच पोलिस व सरपंच दत्ता गांजाळे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सोशल डिस्टन्स राखला जावा, यासाठी हातात काठी घेऊन त्यांनी प्रयत्न केले. मास्क लावल्यामुळे रांगेत उभे असलेल्यांची ओळखही पटत नव्हती. पण, जवळ गेल्यानंतर मोफत धान्य योजनेचे किट व शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतलेले काहीजण आढळून आले. त्यांना विचारले असता, "दारू आमच्यासाठी घेत नसून, वडिलांसाठी घेत आहोत,' अशी सारवासारव काहींनी केली. 

काठ्या हाती घेताच तळिरामाची धूम 
सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी काठ्या हातात घेताच तळिरामांनी तेथून धूम ठोकली. दारू दुकानाचे शटर ही सायंकाळी पाच वाजता बंद करण्यात आले. त्यानंतर क्षणात परिसर निर्मनुष्य झाला. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com