fraud case
शेटफळगढे - इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथील ८० वर्षीय ज्येष्ठ महिलेला शासकीय योजनेतून लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून जमीन लिहून घेऊन जमिनीची विक्री करीत ते पैसेदेखील काढून घेतल्याचा प्रकार घडला. या फसवणुकीत महिलेचा नातूदेखील सहभागी होता हे स्पष्ट झाले आहे. त्यावरून याबाबत भिगवण पोलिसांनी नातवासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.