

Beyond Bandish classical music concert Pune
esakal
पुणे : एकीकडे उलगडणारी अभिजात शास्त्रीय संगीताची परंपरा अन् त्याला नव्या संगीतप्रवाहांची जोड देत निर्माण होणारा स्वराविष्कार, असा अनोखा संगीतानुभव रसिकांनी घेतला. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचा सांगीतिक वारसा पुढे नेणारे त्यांचे नातू विराज जोशी यांनी पदार्पणातील सोलो सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली. तरुणाईला आपलासा वाटेल, अशा पद्धतीने सादर झालेल्या 'बियॉंड बंदिश' कार्यक्रमात विराज जोशी यांनी जणू 'ऑरा फार्मिंग' केले.