

पिंपरी, ता. १८ ः ‘श्रीमद् भगवद्गीतेतून राष्ट्रकार्याची प्रेरणा लाभते,’ असे विचार कीर्तनकार पुष्कर औरंगाबादकर यांनी व्यक्त केले.
चिन्मय मिशन पिंपरी-चिंचवड आयोजित श्रीमद्भगवद्गीता बारावा अध्याय (भक्तियोग) पठण-वाचन उपक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबादकर बोलत होते. निगडी प्राधिकरणातील मनोहर वाढोकार सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला ब्रह्मचारिणी मैत्रेयी चैतन्य, चिन्मय मिशन पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष हेमंत गवंडे, सचिव आनंद देशमुख उपस्थित होते. पालक, शिक्षक गटातून वाचनामध्ये हर्षदा बरोटे, कांचन व्हडदी, अनघा लेले, पूनम रायते आणि पठणामध्ये प्रज्ञा रानडे, प्रज्ञा चिटणीस, वंदना निकम यांनी प्रथम क्रमांक मिळविला. सहभागाबद्दल सिटी प्राइड स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. ज्ञानप्रबोधिनीचे डाॅ. मनोज देवळेकर यांचा सन्मान केला. दीपाली फडके यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेतील विजेते
- अ गट ः शिवज्ञा पाटील (ज्ञानप्रबोधिनी), सान्वी खिस्ती (साईनाथ बालक मंदिर), कादंबरी भूमकर (गायत्री इंग्लिश स्कूल), निमिष मोरे (अमृता विद्यालयम्), जीविका पानवलकर (सिटी प्राइड स्कूल), सुश्रुत म्हसकर (सिटी प्राइड स्कूल)
- ब गट ः अन्वित रानडे (ज्ञानप्रबोधिनी), आनंदी चौधरी (सनशाईन इंग्लिश स्कूल), नीतेश पवार (गायत्री इंटरनॅशनल स्कूल), हर्ष कुलकर्णी (सिटी प्राइड स्कूल), अहिल्या भालेराव (खुला गट), दर्श पगारे (अमृता विद्यालय), आदिराज तरडे (मनोरम प्राथमिक शाळा)
- क गट ः श्रीवेद केसकर (ज्ञानप्रबोधिनी), शिवांश व्हडदी (एस. बी. पाटील स्कूल), शिवन्या संत (नारायण हट इंग्लिश स्कूल), अद्वैत देवकर (पोदार स्कूल), नीहिरा अमृतकर (सिटी प्राइड स्कूल)
- ड गट ः सुमेध पाटील (संत तुकाराम महाराज स्कूल), अवनीश चांगण (प्रियदर्शनी स्कूल), धीरज पाटील (एस. पी. एम. मराठी माध्यम शाळा), द्युती आफळे (ज्ञानप्रबोधिनी)
- ई गट ः वरेण्या पराशरम् (द स्टेपिंग स्टोन स्कूल), रेया सिंग (खुला गट), अनुष्का लोहार (व्ही. के. माटे हायस्कूल), स्वरा शिंदे (गायत्री इंग्लिश स्कूल)
- फ गट ः आर्या भिडे (एस. पी. एम इंग्लिश स्कूल)
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.