

नऱ्हेगावातील भैरवनाथ नवचैतन्य तरुण मंडळ समस्त गावकरी मंडळाची स्थापना १९६२ मध्ये झाली. यंदा मंडळाने ६५व्या वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून मंडळाने परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
गणेशोत्सवात दरवर्षी अनोख्या आणि आकर्षक देखाव्यांचे आयोजन हे मंडळाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पारंपरिक धार्मिक वातावरणासोबत कलात्मक सजावटीला प्राधान्य देत भाविकांचे लक्ष वेधून घेण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो. मंडळाच्या वतीने वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले जाते. महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून महिला सहभागाला प्रोत्साहन दिले जाते. गणेश जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन तसेच रक्तदान शिबिर घेण्यात येते.
सामाजिक बांधिलकी जपत मंडळाकडून अनाथाश्रम तसेच मूकबधिर आश्रमातील नागरिकांसाठी जेवण आणि खाऊचे वाटप केले जाते. धार्मिक उत्सवापुरते कार्य मर्यादित न ठेवता गरजू आणि वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याची परंपरा मंडळाने जपली आहे.
मंडळाची वैशिष्ट्ये
- लाइटिंग व फुलांच्या सजावटीला विशेष महत्त्व
- विविध मंदिर व कारंज्यांचे कलात्मक देखावे
- अनाथ व मूकबधिर आश्रमात खाऊ वाटप
कार्यकारिणी
समस्त ग्रामस्थ, नऱ्हेगाव
शब्दांकन : नीलेश चांदगुडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.