विज्ञान, चित्रकला प्रदर्शनाला
वडगावमध्ये मोठा प्रतिसाद

विज्ञान, चित्रकला प्रदर्शनाला वडगावमध्ये मोठा प्रतिसाद

Published on

वडगाव मावळ, ता. ३ ः येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री रमेश कुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा २३ वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. विज्ञान व चित्रकला प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शाळेच्या प्रांगणात आयोजित वर्धापन दिन समारंभाला माईंड एआय या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पूजा हिरे व उद्योजक सुशीलकुमार सहानी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र म्हाळसकर, उपाध्यक्ष सचिन ढोरे, सचिव राजेंद्र वहिले, संचालक राजाराम म्हाळसकर, दिलीप वहिले आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शन तसेच चित्रकला प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध विज्ञान प्रयोगांचे व गृहपयोगी वस्तूंचे त्यांनी कौतुक केले. विज्ञान शिक्षक व चित्रकला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी स्वागत केले. शिक्षिका जयश्री कुरणे यांनी प्रास्ताविकात शाळेच्या २३ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. तोहीदा खान यांनी सूत्रसंचालन केले. विज्ञान शिक्षक गणेश विश्वकर्मा, नाझिया शेख, चित्रकला शिक्षिका पूनम ठुबे, ज्योती ठाकरे यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com