

PNE26W54471
भक्ती पवार
स्नेहा शिंदे
------------
महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील
मुलींच्या संघात सोलापूरच्या दोघी
‘बीसीसीआय’तर्फे केरळ येथे आंतरराज्य टी-ट्वेंटी स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २ : ‘बीसीसीआय’च्या वतीने केरळ येथे आंतरराज्य टी-ट्वेंटी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या १९ वर्षांखालील मुलींच्या १६ खेळाडूंमध्ये सोलापूरच्या भक्ती गणेश पवार व स्नेहा संतोष शिंदे या दोघींचा समावेश झाला आहे. या दोघी केरळ येथील स्पर्धेसाठी जाणार आहेत.
सोलापूरच्या भक्ती पवार व स्नेहा शिंदे महाराष्ट्राच्या आंमत्रित सामान्यात चमकदार कामगिरी केली होती. संभाव्य संघाच्या सरावावेळी देखील उत्कृष्ट कामगिरी केली होती. दोघीही ऑलराउंडर आहेत. आंतरजिल्हा सामन्यात देखील त्यांची चांगल्या धावा, गोलंदाजी केली होती. दोघीही पंढरपूर तालुक्यातील आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष दिलीप माने, व्हाइस चेअरमन श्रीकांत मोरे, उपाध्यक्ष मुकुंद जाधव, प्रकाश भुतडा, नितीन देशमुख, सेक्रेटरी धैर्यशील मोहिते पाटील व चंद्रकांत रेंबर्सू, खजिनदार संतोष बडवे यांच्यासह सर्व कार्यकारी समिती व महिला निवड समितीच्या चेअरमन किरण मणियार, स्नेहल जाधव, सारिका कुरनूरकर, मानसी जाधव यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.