शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी बळीराम विरकर

शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी बळीराम विरकर

Published on

शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी बळिराम वीरकर

माण तालुक्याची कार्यकारिणी जाहीर; सहविचार सभा उत्साहात

दहिवडी, ता. ३१ : माण माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी बळिराम वीरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
माजी आमदार दिवंगत शिवाजीराव पाटील यांच्या विचारावर कार्यरत असलेली अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे नेते माधवराव पाटील, राज्याचे अध्यक्ष केशवराव जाधव, सेवानिवृत्त संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाची सहविचार सभा दहिवडीत संपन्न झाली. या सभेत सर्वानुमते नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे ः अध्यक्ष ः बळिराम वीरकर, नेते ः सुभाषराव जगदाळे, सरचिटणीस ः महेश माने, कार्याध्यक्ष ः दत्ता खाडे, कोषाध्यक्ष ः किरण बोराटे, कार्यालयीन चिटणीस ः विद्याधर चव्हाण, संपर्कप्रमुख ः भरत खाडे व अजिनाथ गलांडे, प्रसिद्धीप्रमुख ः पुंडलिक खराडे व विजय काळे, उपाध्यक्ष ः राजेंद्र खरात, सूरज निकाळजे, मोहन शिंदे, सचिन भोंगळे व अशोक सावंत, सहसचिव ः दत्ता कोळी, आश्रमशाळा प्रतिनिधी ः उमेश गोरे.
नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन शिक्षक बॅंकेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र अवघडे, मोहनराव जाधव, नारायण गंबरे, शिवदास खाडे, अरुण गोसावी, सोपान बोराटे, शि. म. जाधव, साहेबराव फडतरे, दत्तात्रय खाडे, सुगंधराव जगदाळे, वर्षा देवकर, हणमंतराव अवघडे, हरीश गोरे, महेंद्र कुंभार, बाजीराव कापसे, अनंत पोळ, शंकर काटकर, नथुराम जाधव, किशोर देवकर यांच्यासह सर्व संघप्रेमींनी केले.
............................
07137
दहिवडी : माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीसमवेत मान्यवर. (रूपेश कदम : सकाळ छायाचित्रसेवा)
.............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com