भाळवणीत पांदडवस्तीवर घरफोडी; ९० हजारांचे दागिने व रोख रक्कम लंपास

भाळवणीत पांदडवस्तीवर घरफोडी; ९० हजारांचे दागिने व रोख रक्कम लंपास
Published on

टुडे १
.................
भाळवणीत घरफोडी

नव्वद हजारांचे दागिने लंपास

भाळवणी, ता.१९ : येथील पांदडवस्ती परिसरात सोमवारी (ता.१८) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाळवणी परिसरातील पांदड वस्ती येथील रहिवासी सुजित मारुती रोहोकले (वय ३४) हे कुटुंबासह राहतात. सोमवारी मध्यरात्री दीड वाजता घरातील सर्वजण झोपले होते. सुजित यांचे भाऊ अजय वैष्णोदेवी दर्शनासाठी बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या खोलीला केवळ कडी लावलेली होती. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी मुद्देमाल लांबवला.
​सकाळी सुजित यांना खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता उचकापाचक झालेली दिसून आली. चोरट्याने ड्रॉवरमधील ४५ हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची चेन, २५ हजार रुपयांची अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी आणि २० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ९० हजार रुपयांचा एवज नेला. पुढील तपास सहायक फौजदार अनिल देवकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com