भाळवणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी चव्हाण उपाध्यक्षपदी साखरे
भाळवणी शाळा समितीच्या
अध्यक्षपदी दामाजी चव्हाण
मंगळवेढा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाळवणीच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर दामाजी चव्हाण यांची तर उपाध्यक्षपदी भारती साखरे यांची निवड करण्यात आली. नवीन पदाधिकारी निवडी संदर्भातील पालकांची बैठक शाळेत झाली. त्या बैठकीमध्ये या निवडी करण्यात आल्या. यावेळी या निवडीमध्ये दिगंबर कोळेकर, अमृता साखरे, तुकाराम रोंगे, किशोर भंडगे, रेश्मा गेजगे, प्राजक्ता गायकवाड, दीपाली साखरे, शिक्षण प्रेमीतज्ञ म्हणून प्रकाश वरकुटे, ग्रामपंचायत प्रतिनिधी लक्ष्मण गायकवाड, शिक्षक प्रतिनिधी दीपाली माळी, सचिव सुरेश इंगोले यांच्या निवडी यावेळी करण्यात आल्या. निवडीनंतर नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सरपंच लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

