

BWN26A00074
भाळवणी ः खड्ड्यात वृक्ष लावून गांधी
खड्ड्यात बसून प्रशासनाचा निषेध
रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात भाळवणीत अनोखे आंदोलन; पालकमंत्र्यांना निवेदन
भाळवणी, ता. ९ :भाळवणी येथील जामगाव रस्ता ते नगर रस्ता (बायपास - एस. के. चौक) या महत्त्वाच्या संपर्क मार्गाची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघात घडत असून, नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या दुरवस्थेविरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाला कंटाळून स्थानिक कार्यकर्ते अशोक रोहोकले व ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्ड्यांतच वृक्ष लावून व स्वतः खड्ड्यात बसून अनोखे प्रतिकात्मक उपोषण आंदोलन केले.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या मार्गावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळकरी मुले, शेतकरी आणि स्थानिक व्यापाऱ्यांना या धोकादायक रस्त्यावरून रोजच मोठी कसरत करावी लागत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पारनेर शाखेच्या अभियंत्यांना पूर्वीच सविस्तर निवेदन देण्यात आले होते. तसेच खासदार डॉ. नीलेश लंके आणि आमदार काशिनाथ दाते यांनाही निवेदनाची प्रत पाठवून पाठपुरावा करण्यात आला होता.
वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने कोणतीही पावले न उचलल्याने अखेर रोहोकले यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. या वेळी पारनेर तालुक्यातील नियोजित कार्यक्रमांच्या दौऱ्यावर असताना या मार्गावरून जाणारे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही आंदोलकांनी थांबवून निवेदनाची प्रत देऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीची मागणी केली. या आंदोलनाच्या ठिकाणी बांधकाम विभागातील उपस्थित झाले असून त्यांच्यामार्फत आश्वासनाची लेखी प्रत आंदोलकांना देण्यास तयार परंतु लोकप्रतिनिधी नीलेश लंके यांच्या उपस्थितीतच आम्ही ही लेखी प्रत स्वीकारू यावर अशोक रोहोकले व आंदोलनकर्ते ठाम आहे.
......
पाऊस संपताच भाळवणी गावातील खराब रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिले आहे. या खराब रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ‘एनएचएआय’च्या अहिल्यानगर संचालकांशी पत्रव्यवहार व भ्रमणध्वनीवरून चर्चा झाली आहे.
- सुबोध वसईकर, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पारनेर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.