Pune Water UpdateSakal
पुणे
Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणातील पाणीपातळी गेल्या वर्षाच्या दुप्पट
Monsoon 2025 : खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात यंदा २९.७६% पाणीसाठा असून, तो मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे.
आंबेठाण : खेड,शिरूरसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड ( ता.खेड) धरणात आज ( दि.२० ) अखेर २९.७६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा दुप्पट असून मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात १४.७० टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

