पुणेकरांसाठी खुशखबर भामा आसखेड धरण भरण्याच्या मार्गावर...

bhama askhed
bhama askhed

आंबेठाण (पुणे) : भामा आसखेड (ता. खेड) धरणात आज  (ता. 27 ) सकाळी सहापर्यंत 58.44 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. अवघ्या 24 तासांत धरण क्षेत्रात 116 मिमी पावसाची नोंद झाली असून धरणात एका दिवसात जवळपास एक टीएमसी पाणीसाठा वाढला असल्याची माहिती धरण प्रशासनाचे भारत बेंद्रे यांनी दिली आहे.

भामा आसखेड धरणातून खेड तालुक्यातील अनेक गावांना, चाकण औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय पुणे शहराच्या पूर्वेकडील उपनगरांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी योजना राबविली जात आहे. त्यामूळे भामा आसखेड धरण भरण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागात म्हणजे धरण क्षेत्रात मागील काही काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाण्याची आवक कमी प्रमाणात होत होती. परंतु काल (ता. 26) पासून धरण क्षेत्रात पावसाची जोरदार संततधार सुरू असल्याने पाण्याची आवक ही मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के भरले होते.

भामा आसखेड हे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भामा नदीवर करंजविहीरे येथे उभारलेले मातीचे धरण आहे. एक जून पासून आजपर्यंत धरण परिसरात 735 मिमी पाऊस झाला आहे. धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता 8.14 टीएमसी इतका असून सध्या धरणात 4.96 टीएमसी पाणीसाठा आहे. 

अजून दोन दिवस हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेली पावसाची संततधार आणि त्यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने होत वाढ पाहता धरण लवकरच भरेल त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com