

नसरापूर : घराच्या परड्याच्या जागेच्या वादातून भांबवडे (ता. भोर) येथे एका तरुणावर कोयता, काठी आणि लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी ऋतीक राजाराम सोनवणे ऋतीक राजाराम सोनवणे (वय २६, रा. भांबवडे, ता. भोर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजगड पोलिसांनी सहा महिला व पाच पुरुष अशा एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. १७) रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. संशयित आरोपी महेश बाबासाहेब सोनवणे, बाबासाहेब सिताराम सोनवणे, शांताबाई सोनवणे, मनिषा सोनवणे (सर्व रा. भांबवडे), मनिष शिर्के, ओंकार शिर्के, कुणाल पायगुडे (सर्व रा. पुणे) आणि इतर चार महिलांनी संगनमत करून ऋतीक यांच्या घरात प्रवेश केला. ''जागा आमची आहे'' असे म्हणत आरोपींनी ऋतीक यांना लाकडी काठी, कोयता आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात ऋतीक गंभीर जखमी झाले असून, झटापटीत त्यांच्या आईचे सोन्याचे मंगळसूत्र गहाळ झाले आहे. राजगड पोलिस ठाण्याचे हवालदार मयुर निंबाळकर या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.