
तळेगाव स्टेशन : ‘‘श्री क्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याशी असलेली सव्वाशे एकर गायरान जमीन ताब्यात घेऊन वारकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारतर्फे येथे कॉरिडॉर विकसित केला जाईल. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून याकामी सर्वतोपरी मदत केली जाईल,’’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.