

भंडारदरा पाणलोटात
काजव्यांचे आगमन
अकोले, ता. १८ : भंडारदरा पाणलोट क्षेत्रात काजव्यांचे तुरळक प्रमाणात आगमन सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांत त्यांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. काजव्यांचे आगमन हे मान्सून आगमनाचे संकेत मानले जात असल्याने आदिवासी बांधवांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. कळसुबाई परिसरात सध्या काजव्यांचा लुकलुकाट सुरू झाला आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत हा नजारा अधिक खुलणार आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भंडारदरा-रतनगड परिसरात काजव्यांची मायावी दुनिया अवतरते. उडदावणे, पांजरे, मुरशेत, भंडारदरा, पिंपरी, वारी, मुतखेल, कोळटेमे आदी आदिवासी भागांसह धबधब्यांच्या परिसरातील हजारो झाडांवर काजव्यांची वस्ती पाहायला मिळते. निसर्गाचा हा अनोखा चमत्कार अनुभवण्यासाठी विविध पर्यटन संस्थांकडून ‘काजवा महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे आगामी काळात भंडारदरा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.