

The Pune Crime Branch and Yavat Police carried out the successful raid based on a confidential tip-off.
Sakal
खुटबाव ( पुणे) : भांडगाव (ता. दौंड )येथे तीन आरोपींना पोलिसांनी तीन अवैध गावठी पिस्तूल, १५ काडतुसे ताब्यात घेत अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून बलेनो चार चाकी वाहनासह ५,३७,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व यवत पोलीस ठाणे यांच्या मार्फत वरील कारवाई करण्यात आली. आरोपी मंगेश शंकर मासोळे (वय २४ वर्षे) सुरज संजय शेलार (वय २६ वर्षे) रोहित प्रेमदास भुजवणे (वय २४ वर्षे) तिघेही (राहणार यवत ता . दौंड)यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.