

Bharat Taxi Launched in Pune
esakal
पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्हाभरातील प्रवाशांची आता रिक्षा किंवा कॅबच्या मनमानी दरवाढीतून (सर्ज चार्जेस) सुटका होणार आहे. सहकार मंत्रालयाने या दोन्ही शहरांत ‘भारत टॅक्सी’ ही नवी सेवा सुरू केली असून, यात प्रवाशांकडून केवळ ‘आरटीओ’ने निश्चित केलेल्या दरानुसारच भाडे आकारले जाईल. विशेष म्हणजे, बुकिंगनंतर अवघ्या साडेचार मिनिटांत कॅब उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांच्या वेळेचीही मोठी बचत होणार आहे.