
पुणे : भारती विद्यापीठ हॉटेल मॅनेजमेंट पुणे रा.से.यो युनिट ने २० फेब्रुवारी २०२५ रोजी सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले. या मोहिमेत ३० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. कार्यक्रम अधिकारी श्री. स्वप्नील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, विद्यार्थ्यांनी किल्ल्यावर असलेल्या समाधी क्षेत्र आणि त्याच्या आसपासची स्वच्छता केली. या मोहिमेत सुमारे ९० किलोग्रॅम कचरा जमा करण्यात आला. या कचऱ्यात फुलांच्या हार, प्लास्टिक बाटल्या, कागदाचे तुकडे, रॅपर आणि इतर कचरा समाविष्ट होता.