मातीतून उगवलेली प्रेरणा : ६०० देशी बियाण्यांची ‘बीज बँक’ उभी करणाऱ्या सौ. भारती नागेश स्वामी
----
देशी बियाणांच्या संवर्धनाला नवी दिशा
संताेष चव्हाण : सकाळ वृत्तसेवा
आधुनिक शेतीत रासायनिक खतांचा वापर आणि बाजारावर अवलंबून असलेली बियाण्यांची पद्धत वाढत असताना शिवडे (ता. कऱ्हाड) येथील भारती नागेश स्वामी यांनी परंपरागत शेतीचा मार्ग स्वीकारत एक वेगळी दिशा दाखवली आहे. मातीतली सुपीकता जपणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि देशी बियाण्यांचे संवर्धन करणे हे ध्येय ठेवून त्यांनी शेतीत उल्लेखनीय कार्य उभे केले आहे.
सुमारे १.३३ हेक्टर क्षेत्रातील त्यांच्या शेतात विविध प्रकारची पिके, औषधी वनस्पती आणि शेकडो झाडांची लागवड करण्यात आली आहे. करंज, आवळा, अर्जुन, बेहडा, कडूलिंब यांसारख्या पर्यावरणपूरक झाडांमुळे शेतीत नैसर्गिक संतुलन राखले जात आहे.
भारती स्वामी यांच्या कार्याची खास ओळख म्हणजे देशी बियाण्यांचे जतन व संवर्धन. त्यांच्या शेतात आज सुमारे ६०० प्रकारच्या देशी बियाण्यांची ‘बीज बँक’ तयार झाली असून, भाजीपाला, कडधान्ये, तेलबिया, धान्ये आणि पारंपरिक पिकांच्या बियाण्यांचे संकलन करण्यात आले आहे. या बियाण्यांच्या माध्यमातून शेतकरी स्वावलंबी व्हावेत आणि स्थानिक पिकांची परंपरा टिकून राहावी, यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करत आहेत.
जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी पारंपरिक पद्धती, मिश्र पीकपद्धती, पाण्याची बचत आणि नैसर्गिक उपायांचा वापर करून त्यांनी रासायनिक शेतीला पर्याय निर्माण केला आहे. गावातील महिला बचत गट आणि विद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दल जागृती निर्माण करण्यासाठीही त्या सक्रिय आहेत.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने भारती नागेश स्वामी यांचे कार्य हे ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वावलंबन, पर्यावरण संवर्धन आणि पारंपरिक शेतीचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.
.............................................................
फाोटाो :........ PNE26W01701
भारती नागेश स्वामी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

