

Bhaskar Jadhav Pune Speech.
sakal
पुणे : भाजप सरकार आल्यानंतर लोकशाहीविरोधी कारभार सुरू आहे. निवडणुका निर्भयपणे होत नाहीत की विरोधी पक्षांना उमेदवार मिळत नाहीत. म्हणून दुसऱ्या पक्षातील तयार झालेले नेते आपल्या पक्षात घ्यायचे. हे म्हणजे दुसऱ्याची मुले आपल्या मांडीवर खेळवण्यासारखे आहे. आता अजित पवारांनी टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील सत्तर हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची भाषा करतात. अजित पवारांची सत्तेत घुसमट होत असून, त्यांना बाहेर पडायचे असल्यास त्यांना मदत करू, असे विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी शनिवारी पुण्यात केले.