

Pune Satara Solapur Get Relief as Bhatghar Dam Becomes Full Water Discharge Starts Into Nira River
sakal
हिर्डोशी : पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील नऊ तालुक्यांसाठी वरदान ठरलेले भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) रविवारी (ता. २) दुपारी १०० टक्के भरले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने जलसंपदा विभागाने दुपारी चार वाजता धरणाच्या आठ स्वयंचलित दरवाजांमधून आणि विद्युत निर्मिती केंद्रातून मिळून एकूण २६१५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू केला आहे.