congress criticism on mahayuti
sakal
पुणे - पुणे महापालिकेच्या ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेचा सर्वाधिक फटका भाजपचे पदाधिकारी आणि नगरसेवकांना बसला आहे. त्यावरून काँग्रेसने महायुती सरकारला लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच ‘महाराष्ट्र विद्रूपीकरण पुरस्कार’ द्यावा, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाच्या या मोहिमेच्या दहशतीने शहरातील बहुसंख्य अनधिकृत फ्लेक्स गायब झाले आहेत.