esakal | खडकवासला धरणातून विसर्ग वाढविला; भिडे पुल पुन्हा जाणार पाण्याखाली
sakal

बोलून बातमी शोधा

khadakwasla.jpg

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी संध्याकाळ पासून पावसाचा जोर वाढला गेल्याने पानशेत, वरसगाव धरणातील विसर्ग वाढविला. परिणामी खडकवासला धरणातील विसर्ग बुधवारी सकाळी नऊ वाजता 27हजार 203क्यूसेक पर्यत वाढविला.

खडकवासला धरणातून विसर्ग वाढविला; भिडे पुल पुन्हा जाणार पाण्याखाली

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी संध्याकाळ पासून पावसाचा जोर वाढला गेल्याने पानशेत, वरसगाव धरणातील विसर्ग वाढविला. परिणामी खडकवासला धरणातील विसर्ग बुधवारी सकाळी नऊ वाजता 27हजार 203क्यूसेक पर्यत वाढविला.

दरम्यान, सहा हजार क्यूसेकपेक्षा जास्त पाणी सोडल्याने मंगळवारी रात्री शिवणे- नांदेड पुलावरून जात असल्याने उत्तमनगर व हवेली पोलिस बंद केली होती. तर 22 हजार क्यूसेक पेक्षा जास्त पाणी सोडल्याने डेक्कन जिमखाना व नारायण पेठ यांना जोडणारा बाबा भिडे पूल पाण्याखाली जाणार असल्याने या रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळी सहा वाजता खडकवासला येथे 19, पानशेतला 71, वरसगाव 70 व टेमघरला 83 मिलिमीटर पाऊस 24 तासात पडला आहे. यावेळी वरसगाव धरणातून नऊ हजार080, पानशेत धरणातुन 10 हजार 434 क्यूसेक पाणी सोडले जात होते. खडकवासला धरणात चार हजार क्यूसेकचा येवा (आवक) होती. यामुळे सकाळी पाच वाजता 22 हजार 981 क्यूसेक सोडले होते. 

त्यानंतर पानशेत वरसगाव चा विसर्ग वाढल्याने नऊ वाजता खडकवासला धरणातील विसर्ग  27 हजार 203 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. यावेळी पानशेत मधून 10 हजार 434, वरसगाव मधून 10 हजार 595 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. टेमघर मधून 600 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. 21 हजार 029क्यूसेक पाणी जमा होत आहे तर खडकवासला धरणातील येवा (आवक) आठ हजार क्यूसेक आहे. खडकवासला धरणातून 27 हजार 203 क्यूसेक पाणी सोडले जात आहे त्या व्यतिरिक्त कालव्यातून एक हजार 54क्यूसेक, शहराच्या विविध पाणी योजना 500 क्यूसेक असा दीड हजार क्यूसेक पाणी धरणातून बाहेर सोडले जात आहे. 

दरम्यान, खडकवासला धरणातून मध्यरात्री 2वाजता 13हजार 981 व पहाटे चार वाजता 18 हजार 491क्यूसेक विसर्ग होता. तो पहाटे पाच वाजता तो 22 हजार क्यूसेकचा विसर्ग केला होता.
 

loading image
go to top