

Bhigwan Love Story Takes Dramatic Turn: 21-Year-Old Woman Says No Abduction, Accuses Mother in Shocking Affidavit
esakal
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे १७ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या कथित अपहरणाच्या घटनेने प्रचंड खळबळ माजवली होती. मात्र आता या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण लागले आहे. २१ वर्षीय तरुणीने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात तिने स्वतःच सांगितले आहे की, ती कोणाच्याही जबरदस्तीने नव्हे तर आपल्या मर्जीने प्रियकरासोबत निघून गेली होती. तिने आपल्या आईवर खोटी तक्रार दाखल करण्याचा गंभीर आरोप करताना, संपूर्ण घटना बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे.