Bhima River Flood: भीमा नदीला अचानक पुराचा तडाखा; नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व उभी पिके पाण्यात

भीमा नदीला अचानक आलेल्या पुरामुळे धानोरे, तळेगाव ढमढेरेसह नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व उभी पिके पाण्यात; मोठे आर्थिक नुकसान, शेतकरी हवालदिल
Continuous rainfall and the sudden rise in the Bhima River have affected several riverside villages in Pune district.

Continuous rainfall and the sudden rise in the Bhima River have affected several riverside villages in Pune district.

Sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने बहुतांश शेतकरी व ग्रामस्थ घरातच बसून राहिले. परंतु आज सोमवारी अचानक भीमा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व पिके पाण्यात गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोमवारी अचानक भीमा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या विद्युत मोटारी व पिके पाण्यात बुडाल्याचे समजल्याने शेतकऱ्यांनी नदीकाठी पावसातच धाव घेऊन गर्दी केली होती, परंतु विद्युत मोटारी व काही शेतकऱ्यांची पिके पाण्यात बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com