Ajit Pawar : ‘भीमा पाटस’कडे १०० कोटी थकबाकी

दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) सुमारे १०० कोटींहून अधिकचे कर्ज थकीत आहे.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Summary

दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) सुमारे १०० कोटींहून अधिकचे कर्ज थकीत आहे.

पुणे - दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) सुमारे १०० कोटींहून अधिकचे कर्ज थकीत आहे. ही थकबाकी भरण्यासाठी या कारखान्याला एकरकमी परतावा (वन टाइम सेटलमेंट) करण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु यासाठी दिलेली मुदत संपून त्यानंतर चार ते पाच महिन्यांचा कालावधी लोटून गेला आहे. याबाबत माहिती घेतली असता, तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने, ही रक्कम भरता आलेली नाही, असे सांगण्यात आले आहे. मात्र ही थकबाकी न भरल्यास जिल्हा बॅंक ही भीमा पाटस कारखान्यावर वसुलीसाठीची नियमावर कारवाई करेल, असे या बॅंकेचे ज्येष्ठ संचालक व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. २१) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

बँकेकडून ७९७४ कोटी कर्जवाटप

जिल्हा बॅंकेला गेल्या आर्थिक वर्षात ३५१ कोटी ३९ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. सध्या बँकेच्या एकूण ठेवी ११ हजार ४८१ कोटींच्या झाल्या आहेत. मार्च २०२३ अखेरपर्यंत एकूण सात हजार ९७४ कोटी तीन लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. चालू वर्षी बँकेच्या शाखेमध्येच शेतकऱ्यांना अवघ्या २० रुपयांत ई सातबारा उतारा उपलब्ध करून देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. सध्या पुणे जिल्हा बँक देशातील एकमेव अग्रेसर बँक ठरली आहे.

बँकेने आता गुगल पे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच दुष्काळी भागातील अडचणीत असलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी दहा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. तसेच बँकेच्या नोकरभरतीसंदर्भात एजन्सी नियुक्त करण्यासाठी सहकार विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे. क्षारपड जमिनीत सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी प्रत्येकी ९६ हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे अध्यक्ष प्रा. दुर्गाडे यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com