पिराची कुरोलीच्या भीमा नदीत मगर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिराची कुरोलीच्या भीमा नदीत मगर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Published on

पिराचीकुरोलीत भीमा नदीपात्रात मगरीचे दर्शन
पंढरपूर, ता. २२ ः पिराचीकुरोली (ता.पंढरपूर) येथील भीमानदीमध्ये येथील काही शेतकऱ्यांना मगर दिसली आहे. मगर आढळून आल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने मगरीचा शोध घेऊन पकडावे, अशी मागणी सरपंच कुलदीप कौलगे यांनी केली आहे. दरम्यान रविवारी (ता. २२) वनविभागाने येथील भीमा नदीच्या परिसरामध्ये मगरीवर लक्ष ठेवण्यासाठी व देखरेख करण्यासाठी कर्मचारी तैनात केले आहेत.

मागील काही दिवसांपासून पिराचीकुरोली येथील गांधीनगर परिसरातील भीमानदीत मगर असल्याची चर्चा होती. दोन दिवसांपूर्वी येथील काही शेतकऱ्यांना नदी पात्रात मगर असल्याचे येथील शेतकरी सुधीर काळे यांना आढळून आले आहे. त्यानंतर मगर असल्याचे व्हीडिओ देखील समाज माध्यमात फिरू लागले आहेत. त्यामुळे येथील शेतकरी व महिलांमध्ये अधिकच भीती निर्माण झाली आहे. येथील काही स्थानिक शेतकऱ्यांनी थेट आमदार अभिजित पाटील यांच्याकडे धाव घेऊन मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

कोट
- पिराचीकुरोली येथील भीमानदीमध्ये मगर असल्याची तक्रार मिळाली आहे. त्यानुसार बंधारा व परिसरामध्ये देखरेख करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठवले आहे. मगर असल्याचे दिसून आल्यास तत्काळ रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात येईल. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांनी नदीकाठच्या परिसरात जाऊ नये.
- शीतल चाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com