

बावडा, ता. ४ : गेल्या चार महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने भीमा नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी उजनी धरणातून तातडीने भीमा नदीत पाणी सोडावे, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने भरणेवाडी येथे जाऊन कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेतली. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन भीमा नदीत पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन भरणे यांनी दिले.
शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २० ते २५ शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भरणे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. पावसाअभावी शेतपिकांची झालेली दुरवस्था, नदीपात्र कोरडे पडल्याने बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना, जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची निर्माण झालेली टंचाई याकडे शेतकऱ्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. या वेळी सुरेश शिंदे, धैर्यशील पाटील, महादेवराव घाडगे, उमेश सूर्यवंशी, विद्यासागर घोगरे, अशोक मगर, संजय नायकुडे, ज्ञानदेव बागल, विक्रम घोगरे, अजित टिळेकर आदी शेतकरी उपस्थित होते. समितीच्या मागण्यांचे निवेदन कृषिमंत्री भरणे यांना देण्यात आले.
भरणे म्हणाले की, भीमा नदीत पाणी सोडण्याबाबत दोन दिवसांत मुंबई येथे मंत्रिस्तरीय बैठक होणार असून, त्यात सकारात्मक निर्णय घेऊन दोन-चार दिवसांत नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल. दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून निर्णायक टप्प्यावर असलेली पिके वाचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक प्रसाद ढवळसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.