दुष्काळात भीमाकाठच्या गावांना दिलासा

दुष्काळात भीमाकाठच्या गावांना दिलासा
Published on: 

केसनंद, ता. २८ : भीमा नदीपात्रातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या भीमा नदीकाठच्या गावांसह वाघोली पंचक्रोशीतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
भामा आसखेड धरणातून सोडण्यात आलेले पाणी वढू बंधाऱ्यात दाखल झाले असून, त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांसह वाघोली परिसराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार माऊली कटके यांनी या प्रश्नासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने भीमा नदीतील पाणीसाठ्यात मोठी घट झाली होती. परिणामी, भीमा नदीकाठच्या दोन्ही वढू, पेरणे, लोणीकंद, केसनंद, कोरेगाव भीमा, डोंगरगाव, बुर्केगाव, पिंपरी सांडस, सांगवी या गावांसह वाघोली पंचक्रोशीतील प्रादेशिक आणि स्थानिक पाणीपुरवठा योजनांवरही परिणाम झाला. वाघोलीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनल्याने नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी आमदार कटके यांनी संबंधित यंत्रणांकडे सातत्याने केली होती.

भामा आसखेड धरणातून दोन हजार क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. हे पाणी आज पुर्ण क्षमतेने वढू बंधाऱ्यात दाखल झाले. त्यामुळे नदीकाठच्या गावांसह वाघोली परिसरातील पाणीपुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित होण्यास मदत होणार आहे.

वाघोली आणि परिसरातील सुमारे एक लाख नागरिकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार असून पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया आणि पाणी उपलब्धतेचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.

पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
शिरूर-हवेली मतदारसंघातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. भीमा नदीकाठच्या गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करून नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केले. वढू बंधाऱ्यात पाणी दाखल झाल्याने वाघोलीचा पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांना दिलासा मिळणे ही समाधानाची बाब आहे. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन आमदार माऊली आबा कटके यांनी केले.

05798

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com