

भीमा कारखान्यात मिल रोलर पूजन; पाच लाख मे.टनाचे उद्दिष्ट
मोहोळ, ता. १२ : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक व कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक तात्यासाहेब नागटिळक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस तोडणी व वाहतूक करार पूजनाचा कार्यक्रमही पार पडला. कारखान्याचे संचालक अनिल आगतराव गवळी, कार्यकारी संचालक एस. जे. शिंदे व अन्य मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी (ता. ९) कारखाना कार्यस्थळी हा कार्यक्रम झाला.
आगामी ऊस गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात चांगले पर्जन्यमान अपेक्षित असल्याने ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. यंदाच्या हंगामात कारखान्याने पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
त्यासाठी आवश्यक ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा, मशिनरी ओव्हरहॉलिंग तसेच दुरुस्तीची कामे सुरू असल्याची माहिती देण्यात आली. येणारा गळीत हंगाम संचालक मंडळ, ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांच्या सहकार्याने नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केला. हंगामपूर्व कामे वेळेत पूर्ण करून कारखाना लवकर सुरू करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या विभागांची कामे तत्परतेने पूर्ण करावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.