Environmental Protest: सह्याद्रीच्या रक्षणासाठी घोडनदीत जलसमाधी आंदोलन; प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगिती

Bhimashankar Environmental Protest : कर्जत-भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड आणि पर्यावरणविनाशकारी प्रकल्पांविरोधात घोडेगाव येथे घोडनदी पात्रात प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन करण्यात आले. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन १५ दिवसांसाठी तात्पुरते स्थगित करण्यात आले.
Environmental activists stage a symbolic water protest in the Ghodnadi river at Ghodgaon against projects threatening the Bhimashankar region

Environmental activists stage a symbolic water protest in the Ghodnadi river at Ghodgaon against projects threatening the Bhimashankar region

esakal

Updated on: 

घोडेगाव : कर्जत भीमाशंकर परिसर येथील वृक्षतोड व पर्यावरणविनाशकारी प्रकल्पांविरोधात शासन व प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ घोडेगाव येथील घोडनदी पात्रात आज (ता 9) रोजी प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन करण्यात आले. प्रशासकीय आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

Loading content, please wait...