Bhimashankar Sugar Factory
sakal
पारगाव - पारगाव, ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गाळप हंगामामध्ये गाळप केलेल्या आठ लाख ८३ हजार ६९ मेट्रिक टन ऊसास १७७ रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे एकूण रक्कम १५ कोटी ६३ लाख तीन हजार आज सोमवारी ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहीती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.