Bhimashankar Temple : भीमाशंकरला जाणाऱ्या भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका; दर्शनाची वेळ आणि वाहतूक व्यवस्था पूर्वीप्रमाणेच

Bhimashankar Temple Darshan Timings Remain Unchanged : भीमाशंकर मंदिराच्या दर्शनाच्या वेळेत किंवा वाहतूक व्यवस्थेत बदल झाल्याचा समाजमाध्यमांवरील संदेश दिशाभूल करणारा आहे. मंदिर पहाटे पाच ते रात्री साडेनऊपर्यंत भाविकांसाठी खुले राहणार आहे.
Bhimashankar Temple News

Bhimashankar Temple News

Sakal
Updated on: 

मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनाच्या वेळेत बदल किंवा सकाळी ९ नंतर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचा समाजमाध्यमांवरील संदेश दिशाभूल करणारा आहे. दर्शनाच्या वेळेत किंवा वाहतूक व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण देवस्थान ट्रस्ट व पोलिसांनी दिले आहे.

Loading content, please wait...