खडकवासलामध्ये आमदार म्हणून मीच निवडून येणार

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

''आमदार म्हणून मीच निवडून येणार आहे. निवडून आलो की, गावातील राहिलेल्या रस्त्यासाठी 20 लाख आणि उर्वरित कामासाठी देखील निधीचे झुकते माप देणार आहे.'' असे आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितले.

खडकवासला : 'आमदार म्हणून मीच निवडून येणार आहे. निवडून आलो की, गावातील राहिलेल्या रस्त्यासाठी 20 लाख आणि उर्वरित कामासाठी देखील निधीचे झुकते माप देणार आहे. असे आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितले. 

त्याचे झाले असे की, सोमवारी त्यांनी गोऱ्हे बुद्रुक येथील 52 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

''गोऱ्हे बुद्रुक गावातील सर्व रस्ते काँक्रीट झाले. फक्त एकच रस्ता काँक्रीटचा करण्याचा राहिला आहे. तो ही माझ्या घराकडे जाणारा आहे. त्यामुळे आणखी 20 लाख रुपयांचा निधी द्या.सरपंच झाला पण, घराकडे जाणारा रस्ता करता आला नाही,असे मला लोक म्हणतील'',असे माजी सरपंच सचिन पासलकर यांनी सांगितले. त्यावेळी बोलताना उत्तर देताना तापकीर यांनी ''मीच पुन्हा निवडून येणार आहे आणि तुझ्या घराकडे जाणारा रस्ता देखील मीच करणार आहे.'' असे सांगितले. 

तसेच ते म्हणाले, ''2011 पोटनिवडणुकीमध्ये सेना भाजप एकत्र होतो. त्यावेळी, तुम्ही सगळ्यांनी मला संधी दिली. परंतू 2014 मध्ये माझ्या विरुद्ध शिवसेनेचा उमेदवार होता. तुम्ही माझ्या विरोधात काम करून सुद्धा मला गावातून जास्त मतदान झाले होते. अशी आठवण सांगताच उपस्थितामध्ये एकच हशा पिकला. यावेळी, तापकीर यांनी बांधकाम साहित्याचे पूजन करीत कार्यक्रमच्या फ्लेक्स सोबत ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व ग्रामस्थ समवेत छायाचित्र घेत कामांचे भूमिपूजन केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhimrao Tapkir is confident about elected as the MLA in Khadakwasla