अवसरी खुर्दमधील महिलांना अश्रू अनावर
मंचर, ता. २९ : पुणे येथे सन २००७ मध्ये पहिल्या भीमथडी जत्रेत आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावातील गटाने तयार केलेल्या मासवड्यांचा आस्वाद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला होता. या आठवणींना उजाळा देताना जोगेश्वरी महिला बचत गटाच्या महिलांना अश्रू अनावर झाले.
चविष्ट मासवड्या तयार करणाऱ्या जोगेश्वरी महिला बचत गटाच्या अध्यक्षा निर्मला सुदाम बिडकर, सचिव शीतल संदीप थोरात, सदस्या भाग्यश्री अशोक बिडकर, मंगल देविदास बारवे, विद्या संतोष शिंदे, अश्विनी श्यामराव थोरात, कविता एकनाथ थोरात, विजया दिलीप थोरात यांचे विशेष अभिनंदन पवार यांनी केले होते.
भारतीय स्टेट बँक शाखा मंचर व ज्ञानशक्ती विकास वाहिनी या संस्थेने आंबेगाव तालुक्यातून मासवडी, पुरणपोळी, सारणाच्या पुऱ्या, मिसळ आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले होते. प्रत्येक स्टॉलला भेट देऊन अजितदादांनी महिलांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले होते.
हा प्रसंग सांगताना निर्मला बिडकर यांना गहिवरून आले. त्या म्हणाल्या, ‘‘दादा आमच्या समोर आल्यानंतर त्यांना मासवड्या दिल्या. त्यांनी आस्वाद घेताच बचत गटातील महिलांचे कौतुक केले. शिवाय समवेत फोटो काढण्याची महिलांची विनंती मान्य केली. या प्रसंगाने आम्ही भारावून गेलो. दुःखद घटना कळल्यानंतर सर्व महिला अस्वस्थ झाल्या होत्या. दादांचा सहवास आणि त्यांनी आम्हाला दिलेली प्रेरणा आम्ही कधीही विसरू शकत नाही,’’ अशी भावना बचत गटातील महिलांनी व्यक्त केली.
15111
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

