
पुणे - महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारी भीमथडी जत्रा २० ते २५ डिसेंबर दरम्यान सिंचननगर येथील कृषी महाविद्यालय मैदानात आयोजित करण्यात आली आहे. प्रायोजक व यशस्वी महिला उत्पादकांच्या हस्ते या जत्रेचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ही जत्रा पुणेकरांसाठी सुरु होईल. २१ ते २५ डिसेंबरदरम्यान सकाळी १० ते रात्री १० या वेळेत जत्रा खुली राहणार आहे.