भिरडाचीवाडी येथे किसनवीर महाविद्यालयाचे शिबिर

भिरडाचीवाडी येथे किसनवीर महाविद्यालयाचे शिबिर

Published on

श्रमसंस्कार शिबिराचे
भिरडाचीवाडीत उद्‌घाटन

भुईंज, ता. ३ : जनता शिक्षण संस्थेच्या वाई येथील किसन वीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे भिरडाचीवाडी येथे नुकतेच विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्‌घाटन झाले.
या शिबिराचे उद्‌घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य गुरुनाथ पगारे यांनी केले. याप्रसंगी भिरडाचीवाडी सरपंच विजय वेळे, उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर, डॉ. आनंद घोरपडे, प्रा. डॉ. सकट, डॉ. समीर पवार, प्रकल्प अधिकारी डॉ. मंजूषा इंगवले, डॉ. भीमाशंकर बिराजदार, प्रा. जयवंत पवार, ग्रामपंचायत सदस्य रमेश दगडे, सुनील दगडे व ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरामध्ये दैनंदिन श्रमदान, प्रार्थना, योगासने, प्रभात फेरी, रक्तदान शिबिर, पशुचिकित्सा शिबिर, विविध विषयांवर तज्ज्ञ वक्त्यांचे व मान्यवरांचे प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच विजय वेळे, देशभक्त आबासाहेब वीर पतसंस्थेचे संचालक सुनील दगडे राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार, ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी, प्रकल्पाधिकारी, ग्रामस्थ व महाविद्यालयीन कर्मचारी हे विशेष परिश्रम घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com