

सासवड, ता. ७ : पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील गट नंबर ७६९ मधील वडिलोपार्जित शेतात विनापरवाना जेसीबीने खोदकाम करून दोन लाख ४१ हजार ५०० रुपये किमतीचा १५० ब्रास मुरूम चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात सुभाष महादू कटके, रा. भिवरी यांनी फिर्याद दाखल केली असून मारुती भैरू कटके, तुकाराम दत्तात्रेय कटके आणि संदेश दत्तात्रेय कटके (सर्व रा. भिवरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुभाष महादू कटके हे ६ नोव्हेंबर २०२५ रोजी पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. यादरम्यान, ६ नोव्हेंबरच्या रात्री ११ ते ७ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजेच्या दरम्यान आरोपींनी त्यांच्या परवानगीशिवाय गट नंबर ७६९ मधील शेतात अनधिकृतपणे २१० फूट लांब व १५ फूट खोल खोदकाम केले. ट्रॅक्टरच्या साहाय्याने १५० ब्रास मुरूम चोरून नेल्यामुळे फिर्यादीच्या शेततळ्याला धोका निर्माण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जेव्हा फिर्यादींनी याबाबत जाब विचारणा केली, तेव्हा आरोपी मारुती कटके याने त्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तहसीलदारांच्या आदेशानुसार व ग्राममहसूल अधिकाऱ्यांच्या पंचनाम्यानंतर २० जुलै रोजी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.