नगराध्यक्ष केबिनमधील फर्निचर कामाची तपासणी

नगराध्यक्ष केबिनमधील 
फर्निचर कामाची तपासणी
Published on

भोर, ता. १९ : प्रशासनाची परवानगी न घेता कार्यालयातील फर्निचरचे नूतनीकरण केल्याप्रकरणी भोरचे नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांच्या केबिनची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंगळवारी (ता. १८) तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.
नगराध्यक्ष आवारे यांनी जुने फर्निचर काढून नवीन काम सुरू केल्याबद्दल भाजपच्या उपनगराध्यक्षा ॲड. जयश्री शिंदे व नगरसेवकांनी १० जुलै रोजी जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. दरम्यान, उपनगराध्यक्षांच्या केबिनचे कामही विनापरवाना झाल्याने मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी १७ जुलै रोजी दोन्ही कार्यालये सील केली होती. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांचे दोन प्रतिनिधी तपासणीसाठी आले असता, सील केलेल्या केबिनची चावी न सापडल्याने दरवाजाची काच तोडून आत प्रवेश करावा लागला. प्रशासनाच्या या चुकीमुळे नगरपालिकेचे नुकसान झाल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com