भोरमधील नागवेलीचे पान इंडिया बुक रेकॉर्डसमध्ये

Nagveli
Nagveli

भोर - येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयातील प्रा. शहाजी लगड यांच्या बागेतील नागवेलीच्या (विड्याच्या) पानाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद करण्यात आली. लगड यांच्या बागेत नागवेलीच्या मोठ्यात मोठ्या वाढलेल्या पानाची लांबी ३० सेंमी व रुंदी १७ सेंमी आहे. 

प्राध्यापक  व योगशिक्षक असलेल्या लगड यांना झाडे लावणे, कलम करणे व झाडांची जोपासना करण्याचा छंद आहे. त्यांनी घराभोवती बागेत व टेरेसवरही फळ झाडांची लागवड केली आहे. त्यांनी चार महिन्यांपूर्वी घराच्या बाजूला नागवेलीच्या (शास्रीय नाव बेटल व्हाइन लीफ) वेलाची लागवड केली आहे. त्याच्या पानाची लांबी नियमित पानांपेक्षा जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर लगड यांनी त्याचे फोटो व चित्रफीत ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडे पाठविली. लगड हे पती- पत्नी झाडांना व वेलांना फक्त सेंद्रिय खताचाच वापर करतात. रासायनिक खताचा एकही दाणा ते वापरत नाहीत. इंडिया रेकॉर्डने पानाची दखल घेऊन ‘मोठ्यात मोठे वाढलेले विड्याचे पान’ अशी नोंद रेकॉर्डमध्ये करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com