
Bhor Politics
Sakal
भोर : पंचायत समितीचे सभापतिपद हे सर्वसाधारण (खुल्या) गटातील महिलेसाठी राखीव असल्यामुळे आणि आरक्षणात तीन जागाही सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठरल्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. सभापतिपद आपल्याच पक्षाकडे आणि आपल्याकडेच राहावे, यासाठी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबातील महिलांची उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली असून मोर्चे बांधणीच्या कामाला लागले आहेत.