भोरमध्ये भात पिकाचा ‘चिखल’

भोरमध्ये भात पिकाचा ‘चिखल’
Published on

भोरमध्ये अतिवृष्टीमुळे भात पिकाचे नुकसान
--
जुलैतील परिस्थिती; उत्पादकांना भरपाईची अपेक्षा
--
भोर : तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यात तालुक्याच्या पश्चिम भागातील हिर्डोशी, वेळवंड, भूतोंडे आणि महुडे खोऱ्यातील भात पिके आणि तालींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची प्रशासनाकडून पाहणी करून पंचनामे करण्यात आले आहेत. पंचनाम्यातील आकडेवारीचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे भोर कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
या नुकसानीमध्ये ४४३ शेतकऱ्यांचे १२३.३८ हेक्टर भात पिकांचे नुकसान, तर १ हजार ४३६ शेतकऱ्यांच्या २५८.२७ हेक्टर क्षेत्रातील बाधित झालेल्या शेतजमिनीचा समावेश आहे. यातून १ कोटी ३३ लाख ६३ हजारांचे नुकसान झाले आहे. भात रोपांसाठी हेक्टरी ८ हजार ५०० रुपये, तर तालींमुळे बाधीत झालेल्या शेत जमिनीसाठी हेक्टरी ४७ हजार रुपयांप्रमाणे भरपाई दिली जाते.
तालुक्यात ७ हजार ५०० हेक्टरवर भात पीक घेतले जाते. या वर्षी जुलै महिन्यात पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे ताली फुटणे, ताली पडणे, पाण्याच्या प्रवाहामुळे मातीचा राडारोडा शेतात वाहून येणे, पीक पाण्याखाली जाणे आदी कारणांमुळे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणची माती खरडून गेल्याने शेत जमिनीबरोबरच भात पिकांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे या वर्षी भात उत्पादनात मोठा फटका बसणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तालुक्यात भात हे प्रमुख पीक असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह याच पिकावर चालतो.
--
प्रतिक्रिया
नुकसानग्रस्त भागातील भात पिके व शेतजमिनीचे पंचनामे करून आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली आहे. शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल.
- शरद धर्माधिकारी, तालुका कृषी अधिकारी, भोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com