

हिर्डोशी, ता. २४ : भोर तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे जमिनीला वापसा मिळाला आहे. त्यामुळे भोर परिसरात भात पेरणीची लगबग सुरू झाली आहे.
जून महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पावसाने दिलासा दिला आहे. पावसामुळे जमिनीला ओलावा आला आहे. त्यात बुधवारी पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने शिंद, नांद, महुडे, नांदगाव आपटी, वाठार आदी भागात शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केली. बैलांच्या औतासह ट्रॅक्टरच्या साहाय्याने भात पेरणी करण्यास सुरुवात केली असून दिवसभर शिवारात पेरणीची लगबग पहायला मिळाली. पुढील दोन तीन दिवस शेतकरी शेताच्या मशागतीसह पेरणीत व्यग्र राहणार आहेत. ज्यांच्याकडे स्वतःचे औत किंवा ट्रॅक्टर आहे अशा शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील पेरणी करून घेत आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे यापूर्वीच खरेदी केली असल्याने कृषी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी तुरळक होती. पुढील काळात वेळेवर व पुरेसा पाऊस झाल्यास भात पिकाचे उत्पादन चांगले येण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
भोरमध्ये ३८ मिलिमीटर झाला आहे. भात पिकांची गादी वाफेवरच पेरणी करावी. कमीत कमी ६० मिलिमीटर पाऊस व वाफसा झाल्याशिवाय सोयाबीन, भुईमूग आदी कडधान्य पिकांची पेरणी करण्याची घाई शेतकऱ्यांनी करू नये
-शरद धर्माधिकारी, तालुका कृषी अधिकारी, भोर
03488
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.